अशोक सराफ म्हणतात, ‘शरद पवार माझे आवडते नेते, माझं एक काम त्यांनी…’

मुंबई – अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे अभिनेते अशोक सराफ, अशोक पवार यांच्यासह रोहिनी हट्टंगडी यांना पुरस्कार देण्यात आले. हा पुरस्कार ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी अशोक सराफ म्हणाले की, हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे, यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, की ज्यांच्याहस्ते हा पुरस्कार मला मिळतोय, ते शरद पवार माझ्यादृष्टीने हा माणूस फार मोठा आहे. त्यांनी माझं एक काम तीन मिनिटांत केले होते, असे म्हणत अशोक सराफ यांनी तो किस्सा सांगितला.
अशोक सराफ म्हणाले की, आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. पुरस्कार मिळाल्यानंतरचा आनंद शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. गेल्या काही दिवसांपासून मला सलग पुरस्कार मिळत आहेत. हा सलग मिळालेला चौथा पुरस्कार आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषदेतून मला पुरस्कार मिळणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. हा पुरस्कार मला आदरणीय शरद पवारांच्या हस्ते मिळाला आहे. माझ्या मनामध्ये कायमच शरद पवार यांच्याविषयी भावना आहेत. माझे आवडते नेते म्हणजे शरद पवार आहेत.
या सोहळ्यानिमित्त तुम्हाला मी एक किस्सा सांगतो. शरद पवारांकडे माझं एक काम होते. त्यांनी ते काम मोजून 3 मिनिटांत केले होते. त्यांनी करुन दिलेले काम खरंच अवघ्या काही मिनिटांत झाले. त्यांच्या कामाचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
त्यांच्या डोक्यात कोणतीही गोष्ट फार पटकन लक्षात राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी भेटलेली व्यक्ती नेहमीच त्यांच्या लक्षात राहते. फक्त लक्षातच राहत नाही तर त्यांची ओळख अगदी नावसकट लक्षात असते.
खरंतर त्यांनी मी पर्सनली केव्हाच भेटलो नाही. पण जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी एक स्मित हास्य दिले. अशा चतुर आणि चाणक्ष व्यक्तीच्या हस्ते मला आजचा अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुरस्कार मिळाला आहे, ही बाब फार महत्त्वाची आहे.





