Ashok Kharat : अशोक खरातचे ते 56 व्हिडिओ कुणी बाहेर काढले? ‘कॅप्टन’ला जाळ्यात अडकवणारा खरा ‘मास्टर माईंड’ कोण? वाचा…

Ashok Kharat : खरातच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉय ने हे संपूर्ण प्रकरण का बाहेर काढलं? आणि त्याच्या नेमका हेतू काय होता? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Updated On:
Ashok Kharat : अशोक खरातचे ते 56 व्हिडिओ कुणी बाहेर काढले? ‘कॅप्टन’ला जाळ्यात अडकवणारा खरा ‘मास्टर माईंड’ कोण? वाचा…

Ashok Kharat Nashik Crime News : नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात (Ashok Kharat)  प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असून तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. महिलांवर कथित अत्याचार करणाऱ्या स्वयंघोषित ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरातच्या कृत्यांचा पर्दाफाश त्याच्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यामुळे झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

सध्या या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (SIT) मार्फत सुरू आहे. मात्र, खरातच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉय ने हे संपूर्ण प्रकरण का बाहेर काढलं? आणि त्याच्या नेमका हेतू काय होता? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

अशोक खरात हा ‘प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स’ नावाचे कार्यालय चालवत होता. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात हे ऑफिस होते. तपासानुसार, याच कार्यालयात अनेक महिलांना बोलावून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Ashok Kharat

Ashok Kharat

Ashok Kharat

खरातच्या नकळत त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ‘नीरज जाधव’ या कर्मचाऱ्याने सीसीटीव्ही फुटेज स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे समोर आले. या फुटेजमधील व्हिडिओ क्लिप्समुळेच संपूर्ण प्रकरण बाहेर आले.

तपासात आतापर्यंत महिलांशी संबंधित तब्बल 56 आक्षेपार्ह क्लिप्स समोर आल्याची माहिती आहे. डिसेंबर 2025 मध्ये नीरज जाधवने या फुटेजच्या आधारे खरातकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्याने तब्बल 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. Ashok Kharat

मात्र, खरातने पैसे देण्यास नकार देत वावी पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल केली. आणि यानंतर प्रकरणाने वेगळे वळण घेतले. नीरजने आपला मोर्चा थेट पीडित महिलांकडे वळवून त्यांच्या अब्रूचा बाजार मांडला. Ashok Kharat

यानंतर, नीरज व इतरांनी शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेचे मॉर्फ फोटो आणि काही व्हिडीओ थेट तिलाच व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकावले होते. मंदिरात दर्शनादरम्यान संशयितांनी तिला गाठून व्हिडिओ दाखवल्याचा आरोप आहे.

Ashok Kharat Case

Ashok Kharat Case

त्यानंतर ती महिला घाबरली व तिने ही बाब खरातला सांगितली. पण खरातने स्वतःला वाचवण्यासाठी तिलाच पोलिसात जाण्यास सांगितले. खरातकडून पैसे मिळण्याची आशा मावळताच नीरजने सिडकोतील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठविला.

मात्र, नीरजचा हाच मास्टरस्ट्रोक त्याच्यावर आणि खरातवर उलटला. मेहुण्याने धीर दिल्याने या पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद देत अशोक खरातच्या वासनांधाचा खरा चेहरा जगासमोर आणला. आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

फेब्रुवारी 2026 मध्ये तक्रारीनंतर अशोक खरातविरोधात गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान: ब्लॅकमेलिंग, खंडणी आणि महिलांच्या छळाचे आरोप समोर आले. नीरज जाधव आणि त्याच्या साथीदारांनी पीडितांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली.

तसेच या प्रकरणाचे धागेदोरे काही राजकीय व्यक्ती, मंत्री आणि सेलिब्रिटींपर्यंत पोहोचत असल्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

या पथकाचे नेतृत्व पुणे येथील एसआरपीएफ च्या बल गट क्र. एकच्या समादेशक तेजस्वी सातपुते करत असून त्यांनी नाशिकमध्ये दाखल होऊन सर्व कागदपत्रांचा ताबा घेतला आहे.

सध्या तपास कुठपर्यंत?

नीरज जाधवला शिर्डी पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. आणखी पीडित महिलांचा शोध सुरू आहे. आर्थिक व्यवहार आणि संभाव्य नेटवर्कची सुद्धा चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ashok Kharat : 'या' दिवशी अशोक खरातचा एन्काऊंटर होणार; महिला नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

2026-03-21 17:50:22

Ashok Kharat : 'या' दिवशी अशोक खरातचा एन्काऊंटर होणार; महिला नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

Ashok Kharat : माझे पती ज्योतिषी नाहीत.! अशोक खरातच्या पत्नीचा मोठा खुलासा; प्रकरणाला वेगळीच दिशा मिळणार?

2026-03-21 17:44:55

Ashok Kharat : माझे पती ज्योतिषी नाहीत.! अशोक खरातच्या पत्नीचा मोठा खुलासा; प्रकरणाला वेगळीच दिशा मिळणार?

Top 10 News : अशोक खरातचा आणखी एक पॅटर्न समोर ते सोने-चांदीच्या दरात मोठी पडझड..: वाचा आजच्या १० टॉप बातम्या..

2026-03-21 17:36:57

Top 10 News : अशोक खरातचा आणखी एक पॅटर्न समोर ते सोने-चांदीच्या दरात मोठी पडझड..: वाचा आजच्या १० टॉप बातम्या..

Rupali Chakankar : चाकणकरांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय म्हणाल्या, पाहा...

2026-03-21 17:16:36

Rupali Chakankar : चाकणकरांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय म्हणाल्या, पाहा...

Ashok Kharat : अशोक खरातचा आणखी कांड उघड; मराठवाड्याच्या हक्काचे ३९ लाख लिटर पाणी पळवले

2026-03-21 16:53:51

Ashok Kharat : अशोक खरातचा आणखी कांड उघड; मराठवाड्याच्या हक्काचे ३९ लाख लिटर पाणी पळवले
Ashok Kharat : अशोक खरातचे ते 56 व्हिडिओ कुणी बाहेर काढले? ‘कॅप्टन’ला जाळ्यात अडकवणारा खरा ‘मास्टर माईंड’ कोण? वाचा… - Dainik Prabhat