Ashok Kharat : ‘भोंदू’ अशोक खरातला ३९ आमदार भेटले? शिवसेना आमदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ
Ashok Kharat : नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात माजी मंत्री दीपक केसरकर यांनी ३९ आमदारांच्या भेटीचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.

Ashok Kharat : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने आधीच राज्यातील राजकारण तापले असताना आता माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
केसरकर यांनी या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत, “खरातला ३९ आमदार भेटले होते, मग फक्त माझंच नाव का घेतलं जातंय?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. Ashok Kharat
खरात प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, या प्रकरणात त्यांचा कोणताही सहभाग नाही आणि मुद्दाम त्यांना लक्ष्य केले जात आहे. Ashok Kharat

Ashok Kharat : ‘भोंदू’ अशोक खरातला ३९ आमदार भेटले? शिवसेना आमदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ
दरम्यान, अशोक खरात प्रकरणातील गंभीर आरोप आणि उघड होत असलेल्या नव्या बाबींमुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. पुढील काळात या प्रकरणातून आणखी कोणती मोठी नावे समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Ashok Kharat




