दैनिक प्रभातचे ज्येष्ठ मुद्रितशोधक अशोक केदारी यांचे निधन
Updated On:

Ashok Kedari : दैनिक प्रभातचे ज्येष्ठ मुद्रितशोधक अशोक देवबा केदारी यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. ८) सकाळी साडेदहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, सून व नातू असा परिवार आहे. लोकसत्ता आणि प्रभात या वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी काम केले आहे. उत्तम कॅरमपटू म्हणून त्यांची ओळख होती.


