Ashok Gehlot : माजी आमदार सुरक्षित नसतील, तर जनतेचे काय? अशोक गेहलोत यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी भरतपूरमध्ये भाजपचे माजी आमदार अतर सिंग भडाना यांच्या हत्येवरून राज्य भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

Ashok Gehlot : माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी भरतपूरमध्ये भाजपचे माजी आमदार अतर सिंग भडाना यांच्या हत्येवरून राज्य भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. गेहलोत यांनी या घटनेला राजस्थानमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळण्याचा पुरावा म्हटले आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा भरतपूरमध्ये एका माजी आमदाराची हत्या झाल्याचे गेहलोत (Ashok Gehlot) यांनी एक पोस्ट केली आहे. त्यांनी आरोप केला की, जेव्हा ७०-८० लोक दिवसाढवळ्या एका माजी आमदाराला घेरून ठार मारू शकतात, तेव्हा या राजवटीत सामान्य माणसाची सुरक्षा देवावर सोपवली आहे.
अतर सिंग भडाना यांच्याशी संबंधित वाद जवळपास दोन वर्षांपासून सुरू होता. इतका काळ पोलीस आणि प्रशासन काय करत होते? ही हत्त्या पोलीस आणि प्रशासनाच्या अपयशाचा परिणाम आहे. ज्या सरकारमध्ये स्वतःचेच माजी आमदार सुरक्षित नाहीत, ते सरकार जनतेला सुरक्षेची हमी कशी देऊ शकते?
काय आहे विषय?
भरतपूर जिल्ह्यातील वैरा पोलीस ठाण्याजवळ भाउंडा गावात एका भाडेपट्ट्यावरून मालक आणि गावकऱ्यांमध्ये जवळपास दोन वर्षांपासून वाद सुरू होता. रविवारी या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. मध्यस्थीचे वारंवार प्रयत्न करूनही, काही लोकांनी भाजपचे माजी आमदार अत्तर सिंग भडाना यांच्यावर हल्ला केला. या घटनेत भडाना आणि त्यांचे अंगरक्षक जखमी झाले. माजी आमदारांची प्रकृती खालावल्याने त्यांना जयपूरला हलवण्यात आले. रात्री सुमारे १२:१५ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.






