Ashok Chavan । Sharad Pawar । Reservation : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पुढे येत आहे. त्यातच आता याच आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येतील असे मत शरद पवार यांनी केलं.
यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, आम्ही त्याबाबाबत पाठींबा देऊ असेही शरद पवार पुढे म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, पवारांच्या या विधानावर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, ” शरद पवार यांना कायदेशीर सर्व गोष्टी माहित आहेत, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळालेले आहे.
अद्याप ते कुठल्याही कोर्टाने प्रतिबंध केलेलं नाही, आता उर्वरित आरक्षणाचा विषय कायदेशीर विषयात आहे. त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्यावर अधिक भाष्य करणार नाही. राज्य शासनाने त्यांचा प्रस्ताव कितपत उचित आहे, हा विचार करावा’, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
मराठा आरक्षण मिळावे ही लोकांची भावना
आरक्षणाच्या संदर्भात बोलताना शरद पवार यांनी,”मराठा आरक्षण मिळावे ही लोकांची भावना असल्याचे म्हटले. तसेच “इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असाही सल्ला यावेळी त्यांनी दिला.
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी, ”त्यांना एकही जागा निवडूण आणता आली नाही. ते लोक माझ्यावर बोलतात, हे प्रसिद्धीसाठी बोलत असतात असं म्हणत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला.