Ashok and Nivedita Saraf At Cannes: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६’ (Cannes Festival 2026) मध्ये यंदा मराठी चित्रपटसृष्टीने अभिमानास्पद क्षण अनुभवला. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी या आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या रेड कार्पेटवर खास उपस्थिती लावत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. Ashok Saraf Nivedita Saraf Cannes Film Festival 2026 विशेष म्हणजे, वयाच्या ७८ व्या वर्षी अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी पहिल्यांदाच कान्सच्या रेड कार्पेटवर (Red Carpet )पाऊल ठेवले. त्यांच्या या उपस्थितीची चर्चा केवळ मराठीच नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीतही मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर या ज्येष्ठ जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Cannes Festival 2026) Ashok Saraf Nivedita Saraf Cannes Film Festival 2026 कान्ससारख्या जागतिक मंचावर अनेक कलाकार पाश्चात्त्य फॅशनचा अवलंब करताना दिसतात. मात्र, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी पूर्णपणे भारतीय आणि मराठमोळ्या संस्कृतीचा सन्मान राखत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या साध्या पण आकर्षक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Ashok and Nivedita Saraf At Cannes) Ashok Saraf Nivedita Saraf Cannes Film Festival 2026 ‘कान्स २०२६’च्या पार्श्वभूमीवर या दोघांचे सुंदर फोटोशूटही समोर आले आहे. या फोटोशूटमध्ये अशोक सराफ यांनी गडद तपकिरी रंगाचा पारंपरिक कुर्ता-सूट आणि त्यावर स्टायलिश जॅकेट परिधान केले होते. त्यांच्या या साध्या आणि रुबाबदार लूकचे अनेकांनी कौतुक केले. (Ashok and Nivedita Saraf At Cannes) Ashok Saraf Nivedita Saraf Cannes Film Festival 2026 तर निवेदिता सराफ यांनी शेवाळी रंगाची आकर्षक सिल्क साडी परिधान केली होती. त्यावर त्यांनी मॅचिंग डिझायनर जॅकेट घातले होते. पारंपरिक आणि आधुनिक स्टाईलचा सुंदर मिलाफ त्यांच्या लूकमध्ये पाहायला मिळाला. त्यांच्या या एलिगंट आणि मराठमोळ्या अंदाजाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. (Ashok and Nivedita Saraf At Cannes) Ashok Saraf Nivedita Saraf Cannes Film Festival 2026 रेड कार्पेटवर एन्ट्री करताच या जोडप्याने उपस्थितांना हात जोडून नमस्कार केला. त्यांच्या या कृतीमुळे भारतीय संस्कृतीची छाप जागतिक मंचावर उमटली. साधेपणा, संस्कार आणि मराठमोळेपणा यांचे सुंदर उदाहरण त्यांनी जगासमोर मांडले. Ashok Saraf Nivedita Saraf Cannes Film Festival 2026 अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या या खास उपस्थितीमुळे मराठी प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी सोशल मीडियावर “मराठी संस्कृतीचा अभिमान” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर मराठमोळ्या शैलीत झळकलेल्या या ज्येष्ठ जोडप्याने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.