Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! प्रस्थान पूर्वी वारकरी दिंड्यांना मिळणार 20 हजार रुपये अनुदान

Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीसाठी दिंड्या पंढरपूरकडे प्रस्तान करत आहेत. राज्य भरातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढपूरमध्ये दाखल होतात. महिनाभर पायी वारी करून त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्राची ही परंपरा कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
अशात सरकारने या दिंड्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान प्रस्थान पूर्वी दिले जाणार आहे. याचा मोठा फायदा दिंड्याना होईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाला याबाबत सूचना दिल्या आहेत. गेल्या वर्षी 1500 दिंड्यांना तीन कोटी रुपयांचा अनुदान वाटप झाले होते.
अगदी तशाच पद्धतीने यंदाही वारकऱ्यांना दिंडी अनुदान दिले जाईल. 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण 1109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती.
त्यानुसार यंदा तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी रु.20,000 रुपये याप्रमाणे एकूण 2,21,80,000 रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.





