Asha bhosle : आशा भोसले यांच्यावर रुणालयात उपचार सुरु; प्रकृतीबाबत नात जनाईने दिली अपडेट
Asha bhosle :

Asha bhosle : बॉलिवूडच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 92 वर्षांच्या आशा भोसले यांना छातीचा संसर्ग झाल्याने हृदयावर ताण येऊन निवासस्थानीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सुरुवातीला त्यांना सीपीआर देण्यात आला. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
सध्या आशा भोसले यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची नात जनाई भोसलेने आपल्या आजीच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.
जनाई भोसले पोस्ट
तिनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “माझी आजी, आशा भोसले, यांना अशक्तपणा आणि चेस्ट इन्फेक्शन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आम्ही विनंती करतो की, तुम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सर्व काही ठीक होईल, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती देऊ.” Asha bhosle
My grandmother, Asha Bhosle due to extreme exhaustion and suffering a chest infection has been admitted to hospital and we request you to value our privacy. Treatment is ongoing and hopefully everything will be well and we shall update you positively.
— Zanai Bhosle (@ZanaiBhosle) April 11, 2026
भारतीय चित्रपट संगीतातील अत्यंत प्रभावशाली आवाज
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची लहान बहीण आशा भोसले या देखील भारतीय चित्रपट संगीतातील अत्यंत बहुमुखी व प्रभावशाली आवाज म्हणून ओळखल्या जातात.
संगीतकार ओ. पी. नय्यर, आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारखी गाणी आशा भोसले यांनी सुपरहिट केलीत. त्यांनी केवळ हिंदीतच गाणी गायली नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. Asha bhosle
हेही वाचा :






