Asaram Bapu Corona : आसाराम बापू कारागृहात पॉजिटीव्ह; आयसीयूत दाखल…
Updated On:

पुणे – अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची बुधवारी अचानक रात्री प्रकृती खालावली असून, त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या आसाराम बापू आयसीयूमध्ये आहेत.
गेल्या तीन दिवसांपूर्वी म्हणजेजच ५ मे रोजी आसाराम बापू यांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला होता. आणि त्यानंतरच त्यांची तब्येत खालावली. जेल प्रशासनाने त्यांना पुढील उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. सध्या आसाराम बापू यांची ऑक्सिजन पातळी कमी झाली असून, त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.





