‘२०२४ ची मतदार यादी का आधारभूत केली जात नाही?’ ; ओवेसीचा निवडणूक आयोगाशी झालेल्या बैठकीनंतर सवाल

Asaduddin Owaisi । बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपासून मतदार यादीपर्यंत गोंधळ सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे, तर दुसरीकडे विविध राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला भेटत आहेत. दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांनीही निवडणूक आयोगाला भेटून मतदार यादीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी,”केल्या जाणाऱ्या प्रक्रियेवर राष्ट्रीय पक्षांशी चर्चा करण्यात आली नाही. त्यांनी सांगितले की, “बीएलओजना प्रशिक्षण देण्यात आले नाही कारण त्यांच्याकडे हँडबुक नाही. त्यामुळे निवडणूक आयोग करत असलेली प्रक्रिया योग्य नाही. ” असे देखील म्हटले आहे. Asaduddin Owaisi ।
असदुद्दीन ओवैसी यांनी प्रश्न केला की, “निवडणूक आयोग २०२४ ची मतदार यादी आधार म्हणून का बनवत नाही?. २०२४ मध्ये मतदान केलेल्या मतदारांना २०२५ मध्ये त्यांची ओळख का विचारली जात आहे? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.
एआयएमआयएम प्रमुखांनी आपल्या निवेदनात, आम्ही आमच्या पक्षात बसून सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर चर्चा करू आणि पुढे निर्णय घेऊ, परंतु इतका कमी वेळ का देण्यात आला यावर आमचा आक्षेप आहे. याशिवाय, अख्तरुल इमान म्हणाले की, “असे बरेच लोक आहेत जे स्थलांतरित कामगार आहेत ज्यांच्याकडे त्यांचे कागदपत्रे नाहीत. ” Asaduddin Owaisi ।





