“तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास मागे नाही, तर अर्धशतक मागे “; असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला दाखवला आरसा

Asaduddin Owaisi । एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले आहे. ओवैसी यांनी पाकिस्तानला,”तुम्ही भारतापेक्षा अर्धशतक मागे आहात” असे म्हणत पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. ओवैसी यांनी काल परभणीत वक्फ विधेयकाबाबत जनतेला संबोधित केले. या जाहीर सभेत त्यांनी पाकिस्तानवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी, “पाकिस्तानात बसून जे लोक बकवास बोलत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुमचा वेळ भारतापेक्षा अर्धा तास मागे आहे, पण अर्धा तासच नाही तर तुम्ही अर्धशतक मागे आहात. तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्कराच्या बजेटइतकेही नाही.” असे म्हणत पाकवर टीका केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलली Asaduddin Owaisi ।
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंदी घातली आहे. अटारी-वाघा सीमा देखील बंद करण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. हे सर्व लोक पहलगामला भेट देण्यासाठी आले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. आता भारतीय विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करू शकणार नाहीत.
पाकिस्तान हमसे आधा घंटा नहीं बल्कि आधी सदी पीछे हैं।#Pahalgam #AsaduddinOwaisi #PahalgamTerroristAttack #AIMIM #PahalgamAttack #owaisi #TerroristAttackpic.twitter.com/15jP4fbgMY
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 27, 2025
पाकिस्तानला भारतासोबत युद्ध नको Asaduddin Owaisi ।
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे, परंतु पाकिस्तानला भारतासोबत युद्ध नको आहे. असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की भारत पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करत आहे, परंतु आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही. जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल.





