श्रेया बुगडेने ‘चला हवा येऊ द्या’ टीमचा फोटो शेअर करताच चाहते झाले नाराजी; नेमकं काय घडलं?

Shreya Bugde| झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ शो मागील काही वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. नुकतेच या शोला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त अभिनेत्री श्रेया बुगडेने संपूर्ण टीमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, स्नेहल छिदम, अंकुर वाढवे हे कलाकार आहेत. मात्र डॉ. निलेश साबळे आणि अभिनेता सागर कारंडे या फोटोत नसल्याने श्रेयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
निलेशच्या संकल्पनेतूनच हा कार्यक्रम उभा राहिला होता. यात त्याने अभिनेता, लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा उत्तमरित्या सांभाळली होती. 10 वर्ष निलेशने या कार्यक्रमात उत्तम काम केले. तर सागरने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. पोस्टमन काका म्हणून तो घराघरात लोकप्रिय झाला. त्याच्याशिवाय हे पात्र दुसरं कोणी साकारू शकत नाही असं प्रेक्षकांनी म्हटलं. मात्र आता या फोटोमध्ये सागर आणि निलेश दोघेही नसल्याने चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. अर्थात या शोमधून दोघांनी देखील बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. Shreya Bugde|
View this post on Instagram
एका चाहत्याने लिहिलं, ‘निलेश आणि सागर का नाही? त्यांना एका भागासाठीही तुम्हाला बोलावता आलं नाही? हे किती वाईट आहे.’ तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘साबळे आणि सागरशिवाय ही टीम पूर्ण होऊच शकत नाही.’ दरम्यान, कुशल बद्रिकेने देखील काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याचे म्हणत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. Shreya Bugde|





