प्राजक्ता माळी दिसताच चाहता आला अन्….; नेमकं काय घडलं? पाहा Video

Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे. अलीकडेच तिच्या ‘फुलवंती या चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. तिने टीव्ही, ओटीटी आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. ती महाराष्ट्राची हास्यजत्रेमध्येही देखील पहायला मिळते. सध्या तिचा चाहता वर्ग देखील दिवसेदिवस वाढत आहे. अशाच एका चाहत्याने तिच्यासोबतच्या एका फोटोसाठी तिला थेट लिफ्ट बाहेर रोखले.
संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा ३’ सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या स्क्रीनिंगला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारही आणि प्राजक्ता माळीही पोहोचली होती. यावेळी थिएटरबाहेर कॅमेऱ्यासमोर पोज दिल्यानंतर ती लिफ्टमध्ये गेली. Prajakta Mali |
View this post on Instagram
तेव्हा एक व्यक्ती आला आणि त्याने दरवाजाला हात लावून लिफ्ट थांबवली. नंतर प्राजक्ताही दार बंद होऊ नये म्हणून लिफ्टच्या एन्ट्रीला उभी राहिली आणि त्या व्यक्तीने फोटो काढला. प्राजक्ताचा चाहत्यासोबतचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दरम्यान संबंधित व्यक्तीचे वागणे नेटकऱ्यांना फारसे रुचलेले नाही. एकाने कमेंट करत लिहिले की, ‘कुठल्याही महिलेसोबत वागताना थोडंस भान असू द्यावं, खास करून पुरुषांनी.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘हा खूप खतरनाक माणूस आहे.’ मात्र अगदी शांततापूर्वक बडेजाव न दाखवता तिने चाहत्याला फोटो दिल्याने प्राजक्ताचं कौतुक केले जात आहे. Prajakta Mali |
हेही वाचा :
महायुतीच्या महामंडळ जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित, कोणाला मिळणार सर्वाधिक जागा?





