महायुतीच्या महामंडळ जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित, कोणाला मिळणार सर्वाधिक जागा?

Mahayuti Government | महायुतीतील महामंडळ जागावाटपाचा पेच अखेर सुटला आहे. संख्याबळाच्या निकषावर भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महामंडळांचे वाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महामंडळांवरील नियुक्त्या हा सत्तावाटपाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो, ज्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि आमदारांना योग्य स्थान मिळते.
सूत्रानुसार, महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या वाट्याला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33, तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 23 असे महामंडळांच्या वाटपावर महायुतीत एकमत झाल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या समन्वय समितीच्या बैठकित महामंडळाबाबत तीनही पक्षात हे सूत्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Mahayuti Government |
मात्र, सिडको आणि म्हाडा या दोन महत्त्वाच्या महामंडळांवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष या महामंडळांवर दावा सांगत असून, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. परिणामी पून्हा एकदा समन्वय समितीची बैठक होणार असून यात पुढील चर्चा होणार आहे. त्यामुळे कुणाच्या वाट्याला कोणते महामंडळ येईल हे तेव्हाच स्पष्ट होणार आहे. Mahayuti Government |
आमदारांमध्ये नाराजी राहू नये, यासाठी महायुती सक्रिय
मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणूकीपूर्वी महामंडळ वाटप करून नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचा महायुतीचा हा प्रयत्न असल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता महायुतीच्या आमदारांमध्ये नाराजी राहू नये, यासाठी महायुती सक्रिय झाली आहे. यातच महामंडळ वाटपामुळे पक्षांतर्गत असंतोष कमी होऊन आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. Mahayuti Government |
हेही वाचा





