Sanjay Rathod | भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये एका मेळाव्यात सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय लक्षात ठेवा, असा इशारा घटकपक्षांना दिला. यावरून नितेश राणेंना त्यांचे मोठे बंधू निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनीही नितेश राणेंना सडेतोड उत्तर दिले आहे. मंत्री संजय राठोड म्हणाले की, “राजकारणात कोण कोणाचा बाप असतो आणि कोण कोणाचा काय असतो हे येणारा काळ दाखवेल. आपण काय बोलाव आणि कोणत्या पद्धतीने स्टेटमेंट द्यावे हे समोरच्या व्यक्तीला समजले पाहिजे,” असा टोला जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांना लगावला. Sanjay Rathod | नितेश राणे काय म्हणाले होते? भाजप मंत्री नितेश राणेंनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांना स्थगिती दिल्याच्या मुद्द्याचा संदर्भ देताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर हल्ला चढवला होता. “कुणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले, तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा,” असा इशारा त्यांनी शिवसेना नेत्यांना दिला होता. Sanjay Rathod | निलेश राणेंचा सबुरीचा सल्ला मंत्री नितेश राणे यांच्या या आक्रमकतेवर त्यांचे थोरले बंधू शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी सबुरीचा सल्ला दिला. ‘नितेशने जपून बोलावे…मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार असं निलेश राणे यांनी म्हटलं होतं. Sanjay Rathod | हेही वाचा: Jitendra Dudi : पुणे जिल्ह्यात ‘डुडी मॉडेल’ची क्रांती; बदल्यांत पारदर्शकतेचा नवा अध्याय!