अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच रामदास आठवलेंची मोठी ऑफर ! पाहा Video

Updated On:

Ramdas Athawale : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण लवकरच अमित शहांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून, काँग्रेसमधील 12 ते 14 आमदार चव्हाण आपल्यासोबत घेऊन जाणार असल्याचीसुद्धा मोठ्या प्रमाणाता चर्चा होत आहे.

अश्यातच, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेयांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. याबाबत रामदास आठवले म्हणाले की, “माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला हा त्यांनी चांगला निर्णय घेतला.

मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. अशोक चव्हाण यांनी महायुतीमध्ये यावे. तसेच महायुतीमधील माझ्या रिपब्लिकन पक्षात त्यांनी प्रवेश करावा, असे आवाहन मी त्यांना करतो, असे आठवले यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. त्यानंतर आपण आतापर्यंत अनेक वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे,

आता नवा पर्याय शोधावा असे वाटते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजूरकर यांनीदेखील राजीनामा दिला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

2026-10-07 22:53:07

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

2026-10-07 19:06:35

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव