अंकिता लोखंडेने सासूसोबतचा मंदिरातील व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी साधला निशाणा

Ankita Lokhande Mother In Law| अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहचली. या मालिकेमुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर ती अनेक शोमध्ये पाहायला मिळाली. याशिवाय तिने चित्रपटात देखील काम केले आहे. अंकिता सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच अंकिताने सासूसोबत मंदिरात पूजापाठ करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
अंकिता लोखंडे आणि तिची सासू या व्हिडिओमध्ये एकत्र मंदिरात जाताना दिसत आहेत. अंकितावर सासू प्रेमाचा वर्षाव करताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अंकिता लोखंडेने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या सासूला मंदिराच्या पायऱ्या चढण्यास मदत करताना आणि त्यांच्यासोबत आरती करताना दिसत आहे. ‘आम्ही एकत्र घालवलेले हे क्षण आमचे प्रेम आणखी वाढवतात आणि आमचे नाते अधिक खास बनवतात,’ असे तिने व्हिडिओ शेअर करत म्हंटले आहे.
View this post on Instagram
शेअर केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर काही चाहत्यांनी अंकिताचे कौतुक केले, तर काही यूजर्सने अभिनेत्रीला ट्रोल केले. व्हिडिओवर कमेंट करत काही युजर्स ‘ढोंगीपणा’ म्हणत आहे. तर एका यूजरने लिहिले की, ‘दर्शन आणि जप करताना रील का करावी लागते?’, तर दुसऱ्या युजरने ‘सोशल मीडियावर शो ऑफ करण्याची गरज का आहे?’ असा सवाल केला आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस 17’ मध्ये अंकिता तिचा पती विकी जैनबरोबर दिसली होती. या शोमध्ये या जोडप्यामध्ये खूप भांडणं पाहायला मिळाली होती. अंकिता लोखंडे तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या सासूनं भांडणादरम्यान मुलगा विक्की जैनला पाठिंबा दिला. यानंतर सासू रंजना जैननं तिला बिग बॉस शोमध्ये येऊन खूप सुनावलं होतं. यावरून अंकिताच्या सासूला खूप ट्रोल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमुळे अंकितासह तिच्या सासूला ट्रोल केले जात आहे.
अंकिताच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती नुकतेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात दिसली होती. ती भारती सिंगच्या नवीन कुकिंग आधारित कॉमेडी रिॲलिटी शो ‘लाफ्टर शेफ’ मध्ये पती विकी जैनबरोबर दिसत आहे.





