Pune Gramin : घोड धरणातून तब्बल ३५ हजार क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Updated On:

न्हावरे : घोडनदीच्या वरच्या भागातील मुसळधार पावसामुळे डिंभे, वडज व येडगाव धरणांचा विसर्ग झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे घोड धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी, घोड धरणाच्या सांडव्यावरुन सुरु असलेला विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जात आहे.
रविवार (दि. २८ सप्टेंबर) दुपारी ४.३० वाजता धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने घोडनदीपात्रात तब्बल ३५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात येत आहे.
सध्या असलेला मुसळधार पाऊस आणि वरील धरणांतून होणाऱ्या विसर्गानुसार घोड धरणातून कमी जास्त प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी अतिशय सावधगिरी बाळगावी. नदीपात्रात अजिबात वावर करू नये, असे आवाहन कुकडी पाटबंधारे विभाग क्रं २चे (श्रीगोंदा) कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांनी केले आहे.




