satara | राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये आर्यन सत्रेचे यशदायी काम

दहिवडी, (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ३६ व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद (मुले व मुली) स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलाच्या व मुलींच्या संघाने कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या संघामध्ये सातारचा आर्यन सत्रे याने महाराष्ट्राला कांस्यपदक पटकावण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली.
आर्यन सत्रे पिंगळी येथे मेरी मता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आठवीत शिकत आहे. या खेळाडूंना जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव वीरभद्र कावडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विष्णू काळेल, गणेश गोरे, अवधूत यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, माणचे तहसीलदार विकास अहिर, उद्योजक अतुल शिंदे, मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य फादर जिनो थॉमस, सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक डांगे पाटील, सचिव वीरभद्र कावडे, उपाध्यक्ष ढापळे, खजिनदार मनोज चव्हाण यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले





