Aryan khan arrest : आता आर्यन खान ‘कैदी नंबर 956’
Updated On:

मुंबई – क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या शारुख खानचा मुलगा ‘आर्यन खान’च्या जामिन अर्जावरचा निर्णय न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यत राखून ठेवला आहे. यामुळे आर्यन खानचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
आर्यन खानला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये इतर कैद्यांसोबत ठेवण्यात आलं आहे. कारागृहात ज्याप्रमाणे प्रत्येक कैद्याला एक नंबर दिला जातो त्याच प्रमाणे आर्यनला 956 हा कैदी नंबर देण्यात आला आहे. त्यामुळे आता जेलमध्ये आर्यन खानला कैदी नंबर 956 नावाने पुकारले जाईल.
तसेच मिळालेल्या माहिती नुसार, आर्यनला 11 ऑक्टोबर रोजी त्याचे वडील म्हणजेच अभिनेता शाहरुख खानने साडे चार हजार रुपयांचं मनी ऑर्डर केलं आहे. तरुंगाच्या नियमांनुसार एका कैद्याला महिन्याला फक्त साडेचार हजार रुपयांच्या मनी ऑर्डरची परवानगी आहे.





