Aryan Arrested : ‘ही वेळसुद्धा निघून जाईल’; लेकाच्या अटकेनंतर सेलिब्रिटींचा शाहरुखला पाठिंबा

मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर कारवाई करत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा ‘आर्यन खान’चा सुद्धा समावेश असून, त्याला देखील अटक करण्यात आली आहे.
एनसीबी अधिकाऱ्यांच्या या कारवाईनंतर अभिनेता शाहरुख खानला बॉलिवूड सेलिब्रिटींनी आधार दिला आहे. अभिनेत्री पूजा भट्टने ट्विट करत लिहलं कि, “‘मी तुझ्यासोबत आहे. तुला आमची गरज आहे अशातला भाग नाही. पण तरी माझा पाठिंबा आहे. ही वेळसुद्धा निघून जाईल.’ असं ती म्हणते. पूजाने ‘चाहत’ चित्रपटात शाहरुख बरोबर काम केलं होत.
Mumbai: Aryan Khan, Arbaz Seth Merchant and Munmun Dhamecha have been sent to NCB custody till tomorrow.
They were arrested in connection with the raid at a party at a cruise off the Mumbai coast yesterday. pic.twitter.com/12MQGPPPIo
— ANI (@ANI) October 3, 2021
अभिनेत्री सुचित्रानेही ट्विट करत शाहरुखला साथ दिली. ‘मुलांना संकटात पाहण्यापेक्षा कठीण पालकांसाठी काहीही नसतं. सर्वांसाठी प्रार्थना. बॉलिवूडला लक्ष्य करणाऱ्यांना एनसीबीने आतापर्यंत चित्रपट स्टार्सवर टाकलेले छापे लक्षात आहे का? त्यांना काहीही सापडलं नाही आणि काहीच सिद्ध झालं नाही. हा फक्त तमाशा आहे. ही प्रसिद्धीची किंमत आहे,’ असं ती म्हणाली.
I stand in solidarity with you @iamsrk Not that you need it. But I do. This too, shall pass. 🙏
— Pooja Bhatt (@PoojaB1972) October 3, 2021
तर दुसरीकडे काल रात्री अभिनेता सलमान खान सुद्धा शाहरुखच्या घरी म्हणजेच, ‘मन्नत’ बंगल्यावर शाहरुखची भेट घेण्यासाठी पोहोचला होता. या भेटी दरम्यान या दोघांमध्ये अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे समजते आहे.
For all those targetting #Bollywood remember all the #NCB raids on filmstars? Yes nothing was found and nothing was proved. #Bollywood gawking is a tamasha. Its the price of fame
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) October 3, 2021
दरम्यान, या सर्व प्रकरणावर अभिनेता सुनील शेट्टीने सुद्धा आपले मत मांडले आहे. ‘जेव्हा त्या क्रुझवर छापा टाकण्यात आला, तेव्हा जे घडलं ते प्रामाणिकपणे समोर येण्याची गरज आहे. कुणा एकाचे नाव घेऊन बाकीच्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये.
Nothing harder for a parent than seeing their child in distress. Prayers to all 🙏
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) October 3, 2021
अनेकांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र नावं काहींचीच समोर आली आहे. अजून तपास सुरु आहे. तेव्हा लोकांनीदेखील थेट निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत पडू नये. तसेच अधिकाऱ्यांनी देखील जे दोषी आहेत त्या सगळ्यांची नावं जाहीर करावीत,’ असं ट्विट सुनिल शेट्टीने रविवारी केलं.





