आर्थिक मंदीवर तोडगा काढू – अरविंद सावंत
Updated On:
पुणे – आर्थिक मंदी, वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी सारख्या ज्वलंत प्रश्नांवर केंद्र सरकार योग्य ती पाऊले उचलत आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक मंत्री अरविंद सावंत यांनी आज येथे दिली.
इंडस्ट्री ऍकॅडमी या सहयोग समिती आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित परिषदेत ते बोलत होते. यावेळी ब्लू स्टारचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती, न्युट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टम्सचे नानिक रूपानी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एस. परशुरामन, प्र-कुलगुरू डॉ. श्रीहरी होनवाडसह आदी उपस्थित
होते.
सावंत म्हणाले, स्मार्ट सिटीसाठी पाणी, वीज आणि परिवहनाची योग्य सुविधा प्रत्येकाला मिळायला हवी. त्यासाठी औद्योगिक क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थेबरोबरच सर्वांनी ही जबाबदारी उचलणे गरजेचे
आहे.





