Arvind Kejriwal Video : वडिलांचा हात धरून केजरीवाल पडले मुख्यमंत्री निवासस्थानाच्या बाहेर; आता ‘या’ बंगल्यात शिफ्ट होणार

Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी त्यांचे जुने निवासस्थान सोडले आणि लुटियन झोनमधील त्यांच्या नवीन पत्त्यावर जाण्यासाठी निघाले. केजरीवाल कुटुंबासह पक्षाचे सदस्य अशोक मित्तल यांच्या ५, फिरोजशाह रोड, मंडी हाऊसजवळील शासकीय निवासस्थानाकडे रवाना झाले.
आपचे म्हणणे आहे की, आता अरविंद केजरीवाल जोपर्यंत जनता दरबारात त्यांच्या प्रामाणिकपणाची पुष्टी करत नाही आणि त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवत नाही तोपर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांचा नवा पत्ता 5, फिरोजशाह रोड असेल.
View this post on Instagram
शुक्रवारपासून ते आपचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी राहणार आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात त्यांची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये त्यांना टिळक लेनमध्ये घर देण्यात आले होते. यानंतर ते सिव्हिल लाईन्समध्ये स्थलांतरित झाले.
गुरुवारी, आप मुख्यालयात, दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले होते की केजरीवाल शुक्रवारी अधिकृत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे करतील. अनेक खासदार, आमदार आणि मंत्र्यांसह दिल्लीतील समर्थकांनी त्यांना त्यांच्या घरी राहण्याची ऑफर दिली होती, परंतु केजरीवाल यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकांनी त्यांना येथून निवडून दिले होते. ते आता अशोक मित्तल यांच्या ५, फिरोजशाह रोड, नवी दिल्ली येथील शासकीय निवासस्थानी कुटुंबासह राहणार आहेत. केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला तेव्हा त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा कोणताही दबाव नव्हता, मात्र त्यांनी वैयक्तिक निर्णय म्हणून राजीनामा दिला होता.





