अरविंद केजरीवालांनी खेळलं हिंदू कार्ड; आणखी एका योजनेची केली घोषणा

Arvind Kejriwal | आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी मोठी घोषणा केली. दिल्लीतील मंदिरांमध्ये काम करणारे पुजारी आणि गुरुद्वारांमध्ये काम करणाऱ्या ग्रंथींना दरमहा १८,००० रुपये मानधन देण्याची घोषणा त्यांनी केली. या योजनेसाठी मंगळवारपासून नोंदणी सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“मंगळवारी मी स्वतः कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरापासून याची सुरुवात करणार आहे. त्यानंतर, आमचे सर्व उमेदवार त्यांच्या संबंधित विधानसभा मतदारसंघात नोंदणी करतील. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजना यांसारख्या पुजारी आणि पुरोहितांना मानधन देण्याच्या योजनेला विरोध करू नका, तसे केले तर त्यांना पाप लागेल,” असे आवाहनही केजरीवाल यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना केले आहे. Arvind Kejriwal |
अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही मंदिरांचे पुजारी आणि गुरुद्वारांच्या पुजाऱ्यांना मानधन देण्याची घोषणा केली आहे. पुजारी-ग्रंथी सन्मान योजना असे या योजनेचे नाव आहे. ही योजना समाजातील अशा लोकांसाठी आहे ज्यांची कधीही कोणत्याही सरकारने किंवा संस्थेने काळजी घेतली नाही. हे लोक मंदिर आणि गुरुद्वारांच्या माध्यमातून देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्ये जपतात. सामान्य जीवनात नैतिक मूल्ये जपण्यातही ते हातभार लावतात. पुजारी आणि ग्रंथी हे मानव आणि देव यांच्यातील पुलाचे काम करतात,” असे सांगत केजरीवाल यांनी या योजनेची घोषणा केली आहे. Arvind Kejriwal |
हेही वाचा:
‘कल्की २८९८ एडी’च्या दुसऱ्या भागात श्रीकृष्णच्या भूमिकेत दिसणार सुप्रसिद्ध अभिनेता?





