‘भाजप धोकादायक खेळ खेळत आहे…’; यमुनेच्या पाण्यावरून अरविंद केजरीवाल यांचा मोठा आरोप

Arvind Kejriwal On Yamuna Water Row । दिल्लीत यमुनेच्या विषारी पाण्यावरून भाजप आणि आप यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष अजूनही सुरूच आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी यावर मोठे विधान केले आहे. यावेळी त्यांनी,”यमुनेच्या विषारी पाण्याबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या माध्यमातून भाजप धोकादायक खेळ खेळत आहे.” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री भगवंत मान, मुख्यमंत्री आतिशी आणि इतर पक्ष नेत्यांसह आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. त्यापूर्वी केजरीवाल यांनी, ‘हरियाणा सरकारने पाठवलेल्या पाण्यात अमोनियाची पातळी शुक्रवारी कमी झाली.” असे म्हटले. ते म्हणाले, “शुक्रवारी (३१ जानेवारी) यमुनेच्या पाण्यात टीडीएस २.०१ मिलीग्राम/लीटर झाला आहे. त्यामुळे जलसंयंत्रे आता काम करू लागली आहेत. यमुनेत अमोनियाचे प्रमाण ७.८ मिलीग्राम असल्याचेही स्पष्ट झाले होते.”
अशा प्रकारे उघड झाला कट Arvind Kejriwal On Yamuna Water Row ।
अरविंद केजरीवाल ते पुढे “आज ज्या पद्धतीने अमोनियाची पातळी कमी झाली आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की जर हरियाणाने ठरवले असते तर अमोनियाची पातळी इतकी वाढली नसती. अशा परिस्थितीत, निवडणूक आयोग भाजप आणि हरियाणा सरकारशी बोलण्याऐवजी, मला एक नोटीस पाठवली जात आहे.” मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याऐवजी मला नोटीस पाठवण्यात आली आहे. निवडणूक आयोग हे एक शूटिंग मॅनेजर आहे.” असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले.
‘कोणतीही शिक्षा दिली तरी आम्ही ती स्वीकारू’ Arvind Kejriwal On Yamuna Water Row ।
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मते, “दिल्लीत पैसे, कपडे आणि सोन्याच्या साखळ्यांचे खुलेआम वाटप केले जात आहे. निवडणूक आयोगाला हे दिसत नाही. दिल्लीला स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी कोणतीही शिक्षा दिली तरी आम्ही ती स्वीकारू. आम्ही तीन बाटल्या पाठवल्या आहेत.” जर निवडणूक आयोगाला वाटत असेल की हे पाणी विषारी नाही तर त्यांनी हे पाणी प्यावे आणि आम्हाला दाखवावे” असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले आहे.





