Arvind Kejriwal breaks down: आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू धोरण घोटाळ्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. तसेच माध्यमाशी बोलताना, “मी भ्रष्टाचारी नाही.” असे म्हटले. दरम्यान , अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना आज दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने दारू धोरण घोटाळ्यातून निर्दोष मुक्त केले. अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रया Arvind Kejriwal breaks down: माध्यमांशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी, “आज न्यायालयाने दारू धोरण घोटाळ्यातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे” असे म्हटले. तसेच त्यांनी, सत्याचा विजय होईल, सत्याचा नेहमीच विजय होतो आणि सत्याचाच विजय होत राहणार, असे म्हणत त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता की न्याय मिळेल” असे सांगितले. Arvind Kejriwal breaks down: अमित शहा आणि मोदी यांनी मिळून आम आदमी पक्षाला नष्ट करण्याचा कट रचला. दारू धोरण घोटाळ्याच्या खोट्या आरोपाखाली पक्षाच्या पाच वरिष्ठ नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. सत्तेत असलेल्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरातून ओढून तुरुंगात टाकण्यात आले. केजरीवाल भ्रष्ट नाहीत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त प्रामाणिकपणा कमावला आहे. अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता Arvind Kejriwal breaks down: दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने कथित दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणातून अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना निर्दोष मुक्त केले आहे. सीबीआयने असेही म्हटले आहे की आरोप ठोस पुराव्याशिवाय करण्यात आले होते. आरोपपत्रात अनेक त्रुटी देखील आहेत. कोणतेही साक्षीदार किंवा विधान आरोपांना पुष्टी देत नव्हते. अरविंद केजरीवाल किंवा मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नाहीत. निष्पक्ष खटल्यासाठी निष्पक्ष तपास आवश्यक आहे. सीबीआयने केलेले आरोप निरर्थक होते. कोणताही गुन्हेगारी कट रचण्यात आला नाही. सरकारी वकिलांना त्यांचा खटला सिद्ध करण्यात अपयश आले. म्हणून, अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.