दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आत्मसमर्पण करण्यापूर्वी सांगितली तुरुंगातली दिनचर्या

Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपली आहे. त्यामुळे ते आज तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांचा अंतरिम जामीन दिल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. दरम्यान, तुरुंगात पोहचल्यानंतर केजरीवाल यांनी आपला त्याठिकाणच्या शेडूल्ड काय असेल याची माहिती दिली आहे.
केजरीवाल यांनी आज तिहारला पोहोचल्यानंतर आत्मसमर्पण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी माहिती देताना,”मी दुपारी ३ वाजता घरून निघेन. घरातून बाहेर पडल्यानंतर मी सर्वप्रथम राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहे. तेथून मी हनुमानजींचा आशीर्वाद घेण्यासाठी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाईन. हनुमान मंदिरात प्रार्थना केल्यानंतर मी पक्ष कार्यालयात जाऊन सर्व कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर तिहारला रवाना होईल.” असे म्हटले आहे.
माननीय सुप्रीम कोर्ट के आदेश पर मैं 21 दिन चुनाव प्रचार के लिए बाहर आया। माननीय सुप्रीम कोर्ट का बहुत बहुत आभार।
आज तिहाड़ जाकर सरेंडर करूँगा। दोपहर 3 बजे घर से निकलूँगा। पहले राजघाट जाकर महात्मा गांधी जी को श्रद्धांजलि दूँगा। वहाँ से हनुमान जी का आशीर्वाद लेने कनॉट प्लेस स्थित…
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 2, 2024
दिल्लीच्या जनतेला केले ‘हे’ आवाहन Arvind Kejriwal ।
याशिवाय त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिल्लीतील लोकांना स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे. मला तिहार तुरुंगात तुम्हा सर्वांची काळजी असेल. तुम्ही आनंदी असाल तर तुमचे केजरीवाल तुरुंगातही सुखी होतील.” असे भावनिक उद्गार काढले आहेत.
मुख्यमंत्री तिहार तुरुंगात कधी पोहोचणार? Arvind Kejriwal ।
सर्वोच्च न्यायालयाने 10 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेश तुरुंग प्रशासनाला दिले होते. निश्चित कालावधी 1 जून रोजी संपला. तब्येतीचे कारण देत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टाच्या सुट्टीतील न्यायाधीशांना अंतरिम जामीन एक आठवड्यासाठी वाढवण्याची विनंती केली होती, परंतु निराश झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज तिहार तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आज संध्याकाळी उशिरा तिहार तुरुंगात पोहोचतील.





