‘भाजपच्या गुंडगिरीमुळे…’ ; आप कार्यकर्त्यांवरील हल्ल्यानंतर अरविंद केजरीवाल संतप्त

Arvind Kejriwal । दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यात प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसून येत आहे. दरम्यान, यंदाची निवडणूक ही केवळ आप आणि भाजप यांच्यात होणार असल्याचे साधारण चित्र तयार झाले आहे. दरम्यान, अशातच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका करत भाजप हा गुंडगिरीचा पक्ष असल्याचा आरोप केला आहे.
दिल्लीत एका प्रचार सभेत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधत, ‘दिल्लीतील जनतेचा आवाज उठवल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांवर भाजपकडून हल्ले होत आहेत. भाजपच्या गुंडगिरीमुळे दिल्ली त्रस्त आहे. याठिकाणी परिस्थिती अशी आहे की आता दिल्लीतील लोक अमित शहांवर नाराज आहेत. संपूर्ण दिल्लीला त्यांच्या विरोधात उभे राहावे लागणार असल्याचे म्हटले.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “दिल्लीत आम आदमी पक्षाचे वादळ आहे. या वादळात भाजपचा मोठा पराभव होत आहे. दिल्लीत त्यांचा पराभव पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे लोक घाबरले आहेत. भाजपच्या लोकांमध्ये गुंडगिरी आहे.” . अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांना निर्देश दिले आहेत की भाजपच्या गुंडांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.”
‘जर पोलिस तुम्हाला त्रास देत असतील तर हॅशटॅग वापरा’ Arvind Kejriwal ।
अरविंद केजरीवाल म्हणाले, “आप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना मारहाण केली जात आहे. महिलांनाही लक्ष्य केले जात आहे. आम्ही दिल्लीला एकत्र करणार आहोत. अमित शहांच्या गुंडगिरीवर प्रत्येकाने पोस्ट करावी. जर पोलिस किंवा भाजपचे लोक तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही ताबडतोब तुमचा मुद्दा हॅशटॅगवर मांडा. संपूर्ण देशाला दिसेल की दिल्लीत भाजपचे गुंड कसे काम करत आहेत.”
दिल्लीला एकत्र येण्याची गरज Arvind Kejriwal ।
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आता दिल्लीला एकत्र यावे लागेल. भाजप आणि अमित शहा यांच्या गुंडगिरीला उत्तर द्यावे लागेल.





