अरुणा इराणी बँकॉकमध्ये गेल्या अन् झाली अशी अवस्था; व्हिडीओ आला समोर

Aruna Irani | ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांचा बँकॉकमध्ये अपघात झाला आहे. अरुणा इराणी बँकॉकला शॉपिंग ट्रिपवर गेल्या होत्या आणि तिथे गेल्यावर दोन दिवसांनी त्यांचा अपघात झाला. रस्त्याने चालत असताना त्यांचा अपघात झाला. त्या मुंबईत परतल्या असून त्यांचा व्हीलचेयरवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बँकॉकमध्ये ट्रिप एंजॉय करताना अपघात झाला, असं अरुणा इराणी इ-टाइम्सशी बोलताना म्हणाल्या. अपघातानंतर त्या खाली पडल्या, त्यानंतर त्यांना लगेच वैद्यकीय उपचार मिळाले आणि दोन आठवड्यांनी प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्या मुंबईला परत आल्या. पण, परत येताच त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाले. आता त्यातूनही बरी होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ट्रिप एवढी एंजॉय केल्यावर हे होणारच होतं”, असंही त्या गंमतीत म्हणाल्या. Aruna Irani |
View this post on Instagram
अरुणा इराणी यांनी हिंदी, कन्नड, मराठी आणि गुजराती सिनेमासह अनेक भाषांमध्ये ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी १९६० च्या दशकात चित्रपटांमध्ये आल्या आणि १९९० पर्यंत, म्हणजे जवळपास ३० वर्षे त्या सातत्याने सहाय्यक भूमिकांमध्ये दिसल्या. ‘बॉबी’, ‘बॉम्बे टू ‘कारवां’, ‘राजा बाबू’, ‘बेटा’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. त्या शेवटच्या २०२४ मध्ये आलेल्या ‘घुडचढी’ या चित्रपटात झळकल्या होत्या. Aruna Irani |
हेही वाचा:
शिंदेंना धक्का! नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडेच राहणार; रायगडबाबत काय निर्णय घेणार?





