Arun Lakhani : सुप्रिया सुळेंचे होणारे व्याही अरुण लखानी यांना भाजपच्या कार्यकारिणीत महत्त्वाचे पद; सहकोषाध्यक्षपदी नियुक्ती
Arun Lakhani : विरोधी पक्षाच्या नेत्याच्या कुटुंबाशी सोयरीक जुळलेल्या अरुण लखानी यांना भाजपने थेट सहकोषाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने राजकीय वर्तुळात या नियुक्तीची विशेष चर्चा होत आहे.

Arun Lakhani : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली असून या कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखानी यांनाही या कार्यकारिणीत स्थान मिळाले असून त्यांची पक्षाच्या सहकोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांचा विवाह सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्याशी निश्चित झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने ही सोयरीक जुळल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
नव्या प्रदेश कार्यकारिणीत आमदार गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांनाही नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच केशव उपाध्ये यांना कार्यकारिणीत बढती देण्यात आली असून नवनाथ बन यांच्याकडे पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्याच्या कुटुंबाशी सोयरीक जुळलेल्या अरुण लखानी यांना भाजपने थेट सहकोषाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने राजकीय वर्तुळात या नियुक्तीची विशेष चर्चा होत आहे.





