\n

अरुण गवळी जामिनीवर नागपूरच्या मध्यवर्ती तरुंगातून बाहेर आला. नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत आणले. तेथून गवळी विमानाने मुंबईकडे रवाना झाला.

\n

अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाकडून १८ वर्षांनंतर जामीन मंजूर झाला असून, (मंगळवारी) त्याची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली.

\n

नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत नेले. आणि त्यानंतर अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाला. विशेष म्हणजे, गवळीला कारागृहामागील गेटमधून गुपचूप बाहेर सोडण्यात आले.

\n

त्याची सुटका गुप्त ठेवण्यासाठी कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. गवळीवर २००६ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटक झाली होती.

\n

कमलाकर जामसंडेकर हत्याकांड प्रकरण काय?

\n

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्याकांडाचा काळ २००७ चा आहे. मुंबईतील सकिना भागातील जामसंडेकर हे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीसोबत प्रॉपर्टी डेव्हलपमेंटवरून वाद होता. सुर्वेने गवळी टोळीमार्फत जामसंडेकरांची ‘सुपारी’ दिली.

\n

गवळी यांनी ही जबाबदारी प्रताप गोडसेकडे सोपवली होती. गोडसे याने नाव न येण्यासाठी नवीन शूटर्स शोधले. गोडसेने श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. दोघांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे ठरले आणि अ‍ॅडव्हान्स म्हणून २०-२० हजार दिले.

\n

विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालसोबत १५ दिवस जामसंडेकरांवर पाळत ठेवली. अखेर, २ मार्च २००७ रोजी संधी मिळताच सकिना येथील रुमानी मंजील चाळीतील जामसंडेकरांच्या घरी घुसून त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्याकांड घडल्यानंतर पोलिसांनी सकिना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि मोक्का कायद्यांतर्गत तपास सुरू केला.

\n

गवळी यांना २००८ मध्ये अटक करण्यात आली. विशेष मोक्का कोर्टाने २०१२ मध्ये गवळी आणि ११ अन्य आरोपींना दोषी ठरवले. यामध्ये ३० लाख रुपयांची सुपारी रक्कम हा प्रमुख मुद्दा होता. मुंबई उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये ही शिक्षा कायम ठेवली. या प्रकरणात गवळी टोळीचा संघटित गुन्हेगारीचा पुरावा सिद्ध झाला.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Arun Gawli : १८ वर्षांनंतर ‘डॅडी’ तुरुंगातून बाहेर! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/devendra-fadanvis-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/arun-gawli-daddy-out-of-jail-after-18-years-underworld-don-arun-gawli-released-from-nagpur-jail#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/devendra-fadanvis-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/arun-gawli-daddy-out-of-jail-after-18-years-underworld-don-arun-gawli-released-from-nagpur-jail#webpage","name":"Arun Gawli : १८ वर्षांनंतर ‘डॅडी’ तुरुंगातून बाहेर! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका","url":"https://www.dainikprabhat.com/arun-gawli-daddy-out-of-jail-after-18-years-underworld-don-arun-gawli-released-from-nagpur-jail","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/arun-gawli-daddy-out-of-jail-after-18-years-underworld-don-arun-gawli-released-from-nagpur-jail#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/devendra-fadanvis-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/arun-gawli-daddy-out-of-jail-after-18-years-underworld-don-arun-gawli-released-from-nagpur-jail#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/arun-gawli-daddy-out-of-jail-after-18-years-underworld-don-arun-gawli-released-from-nagpur-jail","name":"Arun Gawli : १८ वर्षांनंतर ‘डॅडी’ तुरुंगातून बाहेर! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका"}}]}}}

Arun Gawli : १८ वर्षांनंतर ‘डॅडी’ तुरुंगातून बाहेर! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका