सत्ता चालवण्याची कला भाजप जवळ : केंद्रिय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

पुणे – आम्ही जाती धर्म, पंथ आधारित भेदभाव करीत नाही तर सर्वांना साेबत घेऊन काम करताे. सत्ता चालवण्याची आणि देशाचा विकास करण्याची कला भाजप जवळ आहे. २०१४ मध्ये ६०० काेटीचे बाॅम्ब गाेळे, हत्यारे निर्यात करीत हाेताे आता आपण २३ हजार काेटीचे संरक्षण साहित्य निर्यात करीत आहोत लवकरच ते ५० हजार काेटीपर्यंत पाेहचेल, असे मत केंद्रिय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केले.
तसेच उध्दव ठाकरे यांच्याकडे पाहून स्व.बाळासाहेब ठाकरे यांना आज काय वाटेत असेल. सत्तेसाठी उध्दव ठाकरे विचारधारा सोडून काँग्रेस साेबत गेले. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण करताना काँग्रेसला वेळाेवेळी विराेध केला, अशी टिकाही यावेळी त्यांनी शिवसेनेवर केली.
खडकी येथील आलेगावकर स्कूल ऑडिटेरियम येथे शिवाजीनगर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार सिध्दार्थ शिराेळे यांच्या प्रचार सभेत ते बाेलत हाेते. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रसिध्द वकील एस.के.जैन ,उद्याेजक कृष्णकुमार गाेयल, माजी उपमहापाैर सुनिता वाडेकर उपस्थित हाेते.
राजनाथ सिंग म्हणाले की, महाराष्ट्रमध्ये महायुतीला पोषक वातावरण असून सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास वाटतो. केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात देशात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात येत आहे. त्याचनुसार राज्यात महायुती सरकार विकासकामे काम करीत आहे.
चांगल्याप्रकारे काम करणारे हे सरकार आहे हे जनतेला पटलेले आहे. देशात अनेक वर्ष काँग्रेसचे सरकार राहिले आहे. ते ज्यांच्यासाेबत राहिले ते डुबले अशी परिस्थिती घडल्याचे दिसून येत आहे. सध्या ते महाराष्ट्रात उध्दव ठाकरे व शरद पवार त्यांच्या साेबत असून ते देखील लवकरच डुबतील अशी टिका केली.





