IND vs PAK : अबरारच्या सेलिब्रेशनची खिल्ली ते अभिषेकसोबत रील, अर्शदीपने पाकिस्तानी खेळाडूंना केले ट्रोल, पाहा VIDEO

सामन्यानंतर भारतीय खेळाडू अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि जितेश शर्मा यांनी पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदच्या सेलिब्रेशनची खिल्ली उडवली. अबरारच्या खास ‘सेलिब्रेशन स्टाइल’ला लक्ष्य करत या तिघांनी बाउंड्री रोपजवळ उभे राहून हाताची घडी घालून मान हलवत ‘बाहेर जा’ असा इशारा करत मजा घेतली. या मजेदार क्षणाचा व्हिडिओ अर्शदीप सिंगने आपल्या इन्स्टावर शेअर केला आहे, ज्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडवली. या व्हिडिओत संजू सॅमसन देखील दिसला.
This Is Next Level Trolling!
Jitesh, Arshdeep and Harshit Trolls Pakistani Abrar 🤣 #AsiaCupFinal pic.twitter.com/S0YlZekSSe
— Apurva Singh (@iSinghApurva) September 28, 2025
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा नायक तिलक वर्मा सोबत त्याने “फायनल मॅच यू परफॉर्म” हे प्रसिद्ध मीम पुन्हा सादर केले. ही मीम पाकिस्तानी खेळाडूंच्या इंग्रजीवर तीव्र हल्ला होता. शेजारच्या देशातील खेळाडू अनेकदा इंग्रजी बोलताना चुका करतात. अर्शदीप आणि तिलक यांनी असाच एक व्हिडीओ पुन्हा तयार केला. अर्शदीपने तिलकसोबत एक मजेदार रील तयार केली, जी सोशल मीडियावर व्हायरल झाली.
ARSHDEEP SINGH – PURE ENTERTAINMENT…!!! 🔥🔥pic.twitter.com/jjCepvEJZb
— Diwakar|दिवाकर|દિવાકર|திவாகர் (@TSKUPid) September 28, 2025
एवढेच नाही तर अर्शदीपने आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादवसोबतही एक रील देखील तयार केली.
ARSHDEEP SINGH, AN ENTERTAINER…!!! 😍🔥 pic.twitter.com/2WSVVsIVVt
— Johns. (@CricCrazyJohns) September 28, 2025
Arshdeep Singh remains undefeated. 😂pic.twitter.com/l2m8RSJQYg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 29, 2025
भारताची जेतेपदाच्या विजयाची मालिका कायम –
ARSHDEEP SINGH – PURE ENTERTAINMENT…!!! 🔥🔥pic.twitter.com/jjCepvEJZb
— Diwakar|दिवाकर|દિવાકર|திவாகர் (@TSKUPid) September 28, 2025
आशिया चषकापूर्वी भारताने 2024 टी-20 विश्वचषक आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. या तिन्ही स्पर्धांमधील विजयांसाठी बीसीसीआयने एकूण 204 कोटी रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत. भारतीय संघाच्या या अभूतपूर्व यशाने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर पाकिस्तानच्या खेळाडूंना मात्र मैदानावरील पराभवासह मजेदार टोलेबाजीचा सामना करावा लागला.





