Arshdeep Unwanted Record : पहिल्या ४ चेंडूंत १ धाव अन् पुढच्या २ चेंडूंवर….अर्शदीप सिंगच्या नावावर नोंदवला गेला नकोसा लाजिरवाणा विक्रम
Arshdeep Unwanted Record : आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्शदीपच्या नावावर एक नकोसा आणि लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.

Arshdeep Singh Two Sixes 1st Over Record Ind vs Ire 2nd T20I Ross Adair : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा आणि अत्यंत निर्णायक सामना बेलफास्टच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून हवामान आणि खेळपट्टीचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सामन्याच्या पहिल्याच षटकात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला आयर्लंडच्या फलंदाजाने चांगलाच चोप दिला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्शदीपच्या नावावर एक नकोसा आणि लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
रॉस अडायरने पहिल्याच ओव्हरमध्ये धुवून काढले –
आयरलँडकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रॉस अडायर आणि टिम टेक्टर ही जोडी मैदानात उतरली होती. भारताकडून पहिले षटक टाकण्याची जबाबदारी अर्शदीप सिंगकडे होती. अर्शदीपने अत्यंत टिच्चून गोलंदाजी करत पहिल्या चार चेंडूंवर अवघी १ धाव दिली होती. मात्र, पाचव्या चेंडूवर आयर्लंडच्या रॉस अडायरने जोरदार प्रहार करत सरळ रेषेत एक गगनचुंबी षटकार ठोकला.
अडायर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पुढच्या म्हणजेच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीपच्या डोक्यावरून चेंडू थेट सीमारेषेबाहेर ६ धावांसाठी पाठवला. या लागोपाठच्या दोन षटकारांमुळे पहिल्याच षटकात आयर्लंडने १३ धावा कुटल्या. यासह अर्शदीप सिंग हा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याच्या पहिल्याच षटकात २ षटकार खाणारा भारताचा केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूर या दोघांच्या पहिल्या षटकात दोन षटकार मारले गेले होते.
Rose Adair smashed a straight six off Arshdeep Singh ball. pic.twitter.com/mox9kvooZD
— Kashif (@KashifNdmCric) June 28, 2026
सामन्याच्या पहिल्याच षटकात २ षटकार खाणारे भारतीय गोलंदाज:
- रविचंद्रन अश्विन: विरुद्ध न्यूझीलंड (वर्ष २०१६, नागपूर)
- शार्दुल ठाकूर: विरुद्ध न्यूझीलंड (वर्ष २०२०, ऑकलंड)
- अर्शदीप सिंग: विरुद्ध आयर्लंड (वर्ष २०२६, बेलफास्ट)
अर्शदीपनेच घेतला बदला; आयर्लंडला सुरुवातीलाच धक्के –
Arshdeep Singh strikes. Ross Adair Out on 16 Runs pic.twitter.com/5aH9bLgErF
— Shivansh rajpal (@RajpalShiv46534) June 28, 2026
पहिल्या ओव्हरमध्ये मार खाल्ल्यानंतर अर्शदीप सिंगने जोरदार पुनरागमन केले. आयर्लंडला दुसऱ्या षटकात टिम टेक्टरच्या (१७ धावा) रूपाने पहिला धक्का बसला. यानंतर तिसऱ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या अर्शदीपने त्याचा बदला पूर्ण केला. त्याने धोकादायक ठरणाऱ्या रॉस अडायरला १६ धावांवर खेळत असताना तिलक वर्माच्या हाती झेलबाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आयर्लंडची अवस्था ३ षटकांत २ बाद २६ अशी झाली असून भारतीय संघ सामन्यावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.





