Arshdeep Samreen Tattoo : अर्शदीप सिंग आणि अभिनेत्री समरीन कौरच्या नात्यावर प्रेमाची मोहोर! दोघांच्या ‘त्या’ खास गोष्टीचा फोटो व्हायरल
Arshdeep Samreen Tattoo : क्रिकेटपटू अर्शदीप सिंग आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री समरीन कौर यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Arshdeep Singh Samreen Kaur Special Handwriting Tattoos Viral Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि त्याची गर्लफ्रेंड, प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल समरीन कौर (Samreen Kaur) हे जोडपे सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आले आहे. आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देत या गोड जोडप्याने एकमेकांच्या नावाचे विशेष टॅटू हातावर कोरून घेतले आहेत. समरीनच्या वाढदिवसाच्याच दिवशी या रोमँटिक टॅटूचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून, क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातून या जोडीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एकमेकांच्या हस्ताक्षरात कोरले इनिशिअल्स; लाल रंगाच्या ‘हार्ट’ने वेधले लक्ष!
या टॅटूचे सर्वात मोठे आणि रोमँटिक वैशिष्ट्य म्हणजे दोघांनीही हे टॅटू एकमेकांच्या स्वतःच्या हस्ताक्षराच्या शैलीत (Handwriting) कोरले आहेत. अर्शदीपने आपल्या हातावर समरीनच्या हस्ताक्षरातील तिच्या नावाचे ‘SK’ हे अक्षर गोंदवले आहे, तर समरीनने स्वतःच्या हातावर अर्शदीपच्या हस्ताक्षरातील ‘AS’ अक्षर कोरले आहे. या इनिशिअल्स सोबत काढलेले एक छोटेसे लाल रंगाचे क्यूट हार्ट (Heart) सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बंगळुरू येथील प्रसिद्ध ‘एलियन्स टॅटू’ स्टुडिओमध्ये त्यांनी हा खास टॅटू बनवून घेतला आहे.
‘My Person’ म्हणत दिली होती कबुली; वाढदिवशीच फोटो झाले व्हायरल –
Arshdeep and Samreen tattooed each other’s name on their arm. 🥰 pic.twitter.com/XsD1YQhp5g
— Arshdeep Singh (@ArshdeepSi84848) September 5, 2026
Arshdeep Paaji in true love era pic.twitter.com/9VzygW6pu4
— ƿ🪷 (@DuddWiser) September 5, 2026
आयपीएल २०२६ च्या हंगामादरम्यान अर्शदीप आणि समरीनच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर अर्शदीपने सोशल मीडियावर समरीनसोबतचा खास फोटो शेअर करत ‘My Person’ असे कॅप्शन देऊन नात्याची अधिकृत पुष्टी केली होती. आज (७ सप्टेंबर) समरीन कौरचा वाढदिवस असून, याच खास दिवशी या टॅटूचे ग्लॅमरस फोटो समोर आल्याने चाहत्यांसाठी ही एक गोड सरप्राईज भेट ठरली आहे.
कोण आहे समरीन कौर?; ‘८३’ चित्रपटातही दाखवली अभिनयाची चमक –
समरीन कौर ही मॉडेलिंग आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. २०१८ मध्ये तिने ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व केले होते, ज्यात ती स्टेट फायनलिस्ट ठरली होती. समरीनने रणवीर सिंगच्या ‘८३’, पंजाबी चित्रपट ‘सरदार जी २’, ‘नेल पॉलिश’ ही वेब सीरिज आणि अनेक गाजलेल्या म्युझिक अल्बम्समध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.





