टाळ-मृदंगाच्या गजरात माउलींच्या पालखीचे फलटण मध्ये आगमन
Updated On:

फलटण : तरड गावचा मुक्काम संपून टाळ-मृदंगाचा गजर करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज फलटण मध्ये आगमन केले आहे. दरम्यान, यावेळी ‘माउली… माउली’च्या गजराने अवघी फलटण नगरी दुमदुमली असून, नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
फलटण मध्ये आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्कामी राहणार आहे.





