कुलगाम चकमकीत लष्करी जवान शहीद
Updated On:

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी दोन ठिकाणी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झडल्या. त्यातील एका चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला. ती चकमक एका गावात घडली.
संबंधित गावात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली.
दुसरी चकमक कुलगाम जिल्ह्याच्या इतर भागात घडली. दोन्ही ठिकाणी घडलेल्या चकमकींचा संपूर्ण तपशील तातडीने मिळू शकला नाही. संबंधित मोहिमांमध्ये लष्करी जवानांसमवेत पोलीस सहभागी झाल्याचे समजते. त्या मोहिमा रात्री उशीरापर्यंत सुरू होत्या.





