‘अर्जुनला रुळायला वेळ लागेल…’; सुनील गावसकर
Updated On:

मुंबई -अर्जुन तेंडुलकर अद्याप लहान आहे. केवळ सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून त्याच्याकडून वारेमाप अपेक्षा करणे चूक आहे. त्याला वरच्या स्तरावरील क्रिकेटमध्ये रुळायला वेळ लागेल, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. अर्जुनने यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले. आतापर्यंत तो केवळ दोनच सामने खेळला आहे व त्यात त्याने सनरायझर्स हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारला बाद करत आपला पहिला बळी मिळवला.
त्याच्या या प्रगतीचा आनंद आहेच; परंतु चाहते लगेचच सचिनचा मुलगा म्हणून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा करत आहेत. त्याला अजून वेळ द्या, त्याला खूप अनुभव घ्यायचा आहे त्यातून भरपूर काही शिकायचे आहे व परिपक्व बनायचे आहे. त्यामुळे विनाकारण आतापासूनच त्याच्यावर अपेक्षांचे ओझे टाकले जाऊ नये, असेही ते म्हणाले.





