Arjun Tendulkar Wedding : अर्जुन-सानियाचा शाही विवाहसोहळा संपन्न; वरमालेनंतरच्या ‘त्या’ खास क्षणाचा VIDEO होतोय व्हायरल
Arjun Tendulkar Wedding : या लग्नातील सर्वात जास्त चर्चेत असलेला व्हिडिओ वरमाला विधीवेळचा आहे. एकमेकांना वरमाला घातल्यानंतर सानिया चंडोकने अर्जुनकडे एक गोड इशारा केला.

Arjun Tendulkar Sania Chandhok Wedding Video Viral : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर अखेर विवाहबंधनात अडकला आहे. अर्जुन आणि सानिया चंडोक यांचा विवाहसोहळा ५ मार्च रोजी मुंबईत अत्यंत थाटामाटात पार पडला. या शाही लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, एका खास व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वरमालेनंतरचा ‘तो’ रोमँटिक क्षण व्हायरल – (Arjun Tendulkar Wedding )
लग्नातील सर्वात जास्त चर्चेत असलेला व्हिडिओ वरमाला विधीवेळचा आहे. एकमेकांना वरमाला घातल्यानंतर सानिया चंडोकने अर्जुनकडे एक गोड इशारा केला. सानियाचा हा मूक इशारा अर्जुनने लगेच ओळखला आणि त्याने तिला प्रेमाने मिठी मारली. हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून चाहत्यांकडून त्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.
Arjun Tendulkar, the son of Sachin Tendulkar, got married to Saaniya Chandhok today in Mumbai.❤️
Congratulations to Arjun and Saaniya. Best wishes for a happy life together. 💐 pic.twitter.com/HhkU9is64F
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 5, 2026
या आनंदाच्या क्षणी अर्जुनचे वडील सचिन तेंडुलकर, आई अंजली तेंडुलकर, बहीण सारा तेंडुलकर आणि इतर कुटुंबीय तिथे उपस्थित होते. सर्वांनी अक्षता टाकून या नवविवाहित जोडप्याला भरभरून आशीर्वाद दिले.
दिग्गजांची मांदियाळी; धोनीसह अनेक स्टार्सची उपस्थिती – (Arjun Tendulkar Wedding )
मुंबईत पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. क्रिकेट जगतातून प्रामुख्याने सेलिब्रिटींनी हजेरी लावली:
- माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी.
- बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर.
- टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर आणि त्याची पत्नी
- माजी प्रशिक्षक राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि झहीर खान.
हेही वाचा – MS Dhoni Fine : आयपीएल २०२६ पूर्वी एमएस धोनीवर रांचीत दंडात्मक कारवाई! काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या
याशिवाय युवराज सिंह, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, किरण मोरे आणि व्यंकटेश प्रसाद यांसारख्या स्टार खेळाडूंनीही हजेरी लावली.
लग्नानंतरचा सानिया आणि अर्जुनचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून, त्यात ते पाहुण्यांचे अभिवादन स्वीकारताना दिसत आहेत.






