Malaika Arora : मलायका अरोराने मुंबईतील आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्याने; तीन वर्षांसाठी केला करार
Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोराने तिचे मुंबईतील आलिशान भागातील अपार्टमेंट भाड्याने दिले आहे.

Malaika Arora : पन्नाशी ओलांडली तरी बॉलिवूडची स्टाइल आयकॉन मलायका अरोरा आजही युवा अभिनेत्रींना टक्कर देते. लाखो तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी ही अभिनेत्री दोन कारणांमुळे सध्या चर्चेत आहे.
एक म्हणजे तिचं नवं रिलेशनशिप आणि दुसरं म्हणजे तिच्या मुंबईतील आलिशान अपार्टमेंटचा भाड्याचा करार. मलायकाने मुंबईतील आलिशान अपार्टमेंट 3 वर्षांसाठी भाड्याने दिले आहे. Malaika Arora
Square Yards च्या माहितीनुसार, मलायका अरोराने वांद्रे वेस्टमधील कार्टर रोडजवळील ‘विदा’ या प्रीमियम इमारतीतील आपले लग्झरी अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. हा करार थेट 3 वर्षांसाठी करण्यात आला असून, एकूण भाड्याची रक्कम 1.17 कोटी रुपये आहे. दरवर्षी भाड्यात 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. Malaika Arora
ही डील 18 मार्च 2026 रोजी रजिस्टर झाली. यासाठी 30, 819 रुपये स्टँप ड्युटी आणि 1000 रुपये रजिस्ट्रेशन फी भरण्यात आली. अपार्टमेंट अदिती राव यांना भाड्याने देण्यात आले असून, त्यांनी 20 लाख रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट जमा केले आहे. Malaika Arora
मलायकाची पर्सनल लाईफ पुन्हा हॉट Malaika Arora
प्रोफेशनल लाईफबरोबरच मलायका सध्या आपल्या पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत आहे. ती एका मिस्ट्री मॅनसोबत सतत स्पॉट होतेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती व्यक्ती हिरे व्यापारी हर्ष मेहता आहे.

Malaika Arora : मलायका अरोराने मुंबईतील आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्याने; तीन वर्षांसाठी केला करार
नुकत्याच राजस्थानातील आदिनाथ जैन मंदिरात दोघे एकत्र दर्शनाला गेले होते. तिथले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापूर्वी मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत डेट करत होती, पण त्यांचा ब्रेकअप झाला.
आता हर्ष मेहतासोबत तिचे नाव जोडले जात असून चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे. दोघांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.





