Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री, डान्सर आणि मॉडेल मलायका अरोरा नेहमी कोणत्या कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. अलिकडेच एका कॉन्सर्टमध्ये ती ‘मिस्ट्री बॉय’ सोबत स्पॉट झाल्याने चांगलीच चर्चा झाली होती. अरबाज खानसोबत घटस्फोट आणि नंतर अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. मात्र, अभिनेता सौरभ बेदी सोबत रोमँटिक पोज देताना दिसल्याने दोघे एकमेकांना डेट करत असल्याची अफवा पसरली. Malaika Arora या चर्चा रंगल्या असताना मलायका अरोराने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “आता हे सगळं जास्तच होतंय. पण मी या गोष्टींकडे विनोद म्हणून पाहते. बऱ्याचदा मी आणि अरहान या गोष्टींवर हसतो. या गोष्टी काही माझ्या हातात नाहीत. जे व्हायचं ते होणारच आहे. सध्या माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्यानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि मी खुश आहे. जोडीदाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर, ते सगळं छानच असतं. जर मला कोणासोबत राहायचे असेल, तर ते मी माझ्या अटींवरच राहीन.” Malaika Arora : डेटिंगच्या अफवांवर मलायका अरोरा भडकली! म्हणाली “आता हे सगळं जास्तच होतंय. पण…” या दोघांमध्ये साधारण 21 वर्षांचे वयाचे अंतर आहे. दुसरीकडे, सौरभ बेदीनेही ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत डेटिंगची चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली आहे. आहे. त्याने म्हटले, “मलायका आणि माझं नाव जोडलं जाणं हे खूपच निराशाजनक आहे. आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे. Malaika Arora 52 वर्षीय मलायका अरोरा (Malaika Arora) ही फिटनेस फ्रिक म्हणूनही ओळखली जाते. तिचे लग्न अरबाज खानसोबत झाले होते, त्यांचा नात्याचा शेवट 19 वर्षांनी झाला. दोघांनी एकमेकांसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. सध्या मलायका आपल्या आयुष्याच्या नव्या टप्प्यात आनंदाने जगत आहे. हेही वाचा : Lockdown in India: देशात लॉकडाउन लागू होणार का? ; केंद्र सरकारने केली ‘ही’ घोषणा, वाचा केंद्रीय मंत्री काय म्हणाले ?