अरिजित सिंगची प्रकृती खालावली ? लाइव्ह कॉन्सर्ट लांबणीवर चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

आपल्या हृदयस्पर्शी आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे.
ब्रिटनमध्ये 11 ऑगस्ट रोजी होणारा त्यांचा लाइव्ह कॉन्सर्ट त्यांनी पुढे ढकलणार असल्याचे सांगितले आहे. लाइव्ह कॉन्सर्ट च्या नवीन तारखा चाहत्यांसाठी जाहीर करण्यात आल्या आहे. शो लांबणीवर जाण्यामागचे कारणही समोर आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अरिजित सिंगने आपला कार्यक्रम रद्द केला आहे.
View this post on Instagram
अरिजित सिंगने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याने लाइव्ह कॉन्सर्ट पुढे ढकलल्याबद्दल माहिती दिली. त्याने लिहिले, ‘प्रिय चाहत्यांनो, मला हे जाहीर करताना दु:ख होत आहे की, अनपेक्षित वैद्यकीय परिस्थितीमुळे मला ऑगस्टमधील आमचा कॉन्सर्ट पुढे ढकलणे भाग पडले आहे.’
चाहत्यांच्या निराशेबद्दल मला वाईट वाटत आहे. असेही त्याने लिहिले आहे.’मला माहित आहे की, तुम्ही या शोची किती आतुरतेने वाट पाहत आहात आणि या निराशेबद्दल मला मनापासून खेद वाटते. तुमचे प्रेम आणि पाठिंबा हीच माझी ताकद आहे. चला या ब्रेकला आणखी जादुई री-युनियनच्या वचनात बदलू या.’ असेही त्याने सांगितले आहे.
‘हमरी अधुरी कहानी’, ‘ओ सजनी रे’, ‘तेरा यार हूं मैं’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांचा गायक अरिजितने चाहत्यांचे समजूतदारपणा, संयम आणि अतूट प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मैफल पुढे ढकलल्याबद्दल त्याने चाहत्यांची मनापासून माफी मागितली. त्याच्या या पोस्टवर चाहते चिंता व्यक्त करत आहे





