Arijit Singh : गायनातून निवृत्ती घेतलेल्या अरिजीत सिंहची चाहत्यांसाठी भावूक पोस्ट
Arijit Singh : करिअरच्या शिखरावर असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे जगभरातील अरजित सिंगचे चाहते निराश झाले होते.

Arijit Singh : गायक अरिजीत सिंहंने महिनाभरापूर्वीच प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. करिअरच्या शिखरावर असताना अरिजितने असा निर्णय का घेतला याचं कारण त्याने उघड केलं नाही. मात्र यानंतर आता त्याने सोशल मिडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
अरिजितने आपल्या ‘X’ (ट्विटर) अकाऊंटवर एक लांबलचक नोट लिहिली. त्याने सुरुवातीलाच हा मेसेज फक्त त्याची गाणी ऐकणाऱ्या खऱ्या चाहत्यांसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. पुढे अरिजीतने लिहिलं, “हा संदेश फक्त माझ्या श्रोत्यांसाठी आहे. जर तुम्ही माझे श्रोते नसाल, तर कृपया हे वाचू नका. ही विनम्र विनंती आहे. नमस्कार प्रिय फॅन्स, मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो. या निर्दयी जगात तुमच्या प्रेम आणि विनम्रतेबद्दल मनापासून धन्यवाद.
मी नवीन गाणी घेणं थांबवलं असलं, तरी अजून अनेक गाणी प्रलंबित आहेत. ती एक-एक करून रिलीज होत राहतील. कदाचित संपूर्ण वर्षभर कदाचित पुढच्या वर्षापर्यंतही. लोकांना वारंवार समजावण्यात वेळ वाया घालवू नका, शांत राहा, स्वतःची काळजी घ्या, वाचा, प्रेम करा, ध्यान करा, असा सल्लाही त्याने चाहत्यांना दिला.
यात अरिजितने चाहत्यांना दिलासा दिलाय की, त्याची अनेक गाणी अजून रिलीज व्हायची आहेत, जी कदाचित पुढील संपूर्ण वर्षभर किंवा २०२७ पर्यंत एक-एक करून प्रदर्शित होऊ शकतात. Arijit Singh
This message is just for my listeners
please dont read and swipe right now if you are not my listener, its a humble request.Hello beautiful people! ❤️
I just want to tell you all that I love you.
Thank you so much for your kindness in this ruthless world.
Although I have…— WhoamI (@Atmojoarjalojo) February 24, 2026
यानंतर अरिजीतने आणखी एक ट्वीटही केलं “आणि मग पुढे काय होईल, कोण जाणे…” या एका वाक्याने चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चा रंगली आहे. तो खरंच कायमचा प्लेबॅकपासून दूर राहणार की भविष्यात पुनरागमन करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. Arijit Singh :
प्लेबॅक निवृत्तीची घोषणा
27 जानेवारीला इंस्टाग्रामवर पोस्ट करत अरिजीतने जाहीर केलं होतं की तो प्लेबॅक व्होकलिस्ट म्हणून कोणतेही नवीन असाइनमेंट्स स्वीकारणार नाही. “इतक्या वर्षांत दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. हा प्रवास सुंदर होता,” असं त्याने लिहिलं होतं.
मात्र संगीतावरील प्रेम कायम राहील आणि तो शिकत राहील, असंही स्पष्ट केलं होतं. त्याने करिअरच्या शिखरावर असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे जगभरातील त्याचे चाहते निराश झाले होते.
‘आशिकी २’ मधील ‘तुम ही हो’ या गाण्यापासून जगप्रसिद्ध झालेल्या अरिजीत सिंगने आपल्या गायनाने करोडो लोकांच्या मनावर राज्य केले आहे.
हेही वाचा :





