अरिफ खान यांनी घेतली केरळच्या राज्यपालपदाची शपथ
Updated On:

तिरुअनंतपूरम (केरळ) – केरळच्या राज्यपालपदी अरिफ मोहम्मद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज तिरुअनंतपूरममध्ये त्यांनी राज्यपालपदाची शपथ घेतली.
केरळच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश ऋषिकेश रॉय यांनी त्यांना शपथ दिली. याआधी माजी मुख्य न्यायाधिश पी. सदाशिवम यांनी केरळचे राज्यपाल म्हणून काम केल आहे. त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर आरिफ खान यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि मंत्रिमंडळातील सदस्य, अधिकारी उपस्थित होते.



