पत्नीशी वाद अन् मुंबई विमानतळ उडविण्याची धमकी!
Updated On:

मुंबई – मुंबई नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने “आज दो बजे बॉम्ब ब्लास्ट होनेवाला है मुंबई एअरपोर्ट पर” अशाप्रकारे खोटी माहिती दिली. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा नंबर तात्काळ ट्रेस केला.
अधिक तपासात पोलिसांना हा फोन साकीनाकातून मनजीत कुमार गौतम नावाच्या व्यक्तीने केल्याचे समोर आलेया प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, अंधेरी पूर्व साकीनाका येथे राहणाऱ्या मनजीतने सांगितले की त्याचे बायकोशी भांडण झाले. त्यानंतर त्याने फेक कॉल करत मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली.





