Sshura and Arbaaz Khan : “म्हाताऱ्यासोबत तू खूश आहे का?” ट्रोल करणाऱ्याला अरबाज खानच्या पत्नीचे सडेतोड उत्तर
Sshura and Arbaaz Khan : शूरा खाननं काही दिवसांपूर्वी एक ऑनलाईन चॅट सेशन ठेवलं होतं, जिथे चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची तिनं उत्तरं दिली.

Sshura and Arbaaz Khan : अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना अनेकदा त्यांच्या वयातील अंतरावरून ट्रोलिंचा सामना करावा लागतो. आता पुन्हा एकदा अरबाज खानची पत्नी शूरा खान चर्चेत आली आहे. याच मुद्यावरून ट्रोल केल्याप्रकरणी यावेळी शूरानं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. (Sshura and Arbaaz Khan)
शूरा खाननं काही दिवसांपूर्वी एक ऑनलाईन चॅट सेशन ठेवलं होतं, जिथे चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची तिनं उत्तरं दिली. शूराच्या या ‘सवाल पूछो’ सेशनवेळी एका युजरनं विचारलं की, ‘एका म्हाताऱ्यासोबत तू खूश आहेस?’ (Sshura and Arbaaz Khan)
या प्रश्नावर शूरानं संयमाने उत्तर दिले की, “खरंच का? ते म्हातारे नाहीत, ते एक लिमिटेड-एडिशन विंटेज मॉडल आहेत…” सध्या तिच्या या उत्तराने अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
तर आणखी एका चाहत्यानं शुराला विचारले की, “तू अरबाजसोबत पहिल्या ‘डेट’वर जाण्याचं का मान्य केलंस?” त्यावर शुरानं उत्तर दिलं की, “मी त्याच्यासोबत लावलेली एक पैज हरले होते, त्यामुळे मला त्याला डिनरसाठी घेऊन जावं लागलं.” (Sshura and Arbaaz Khan)

Sshura and Arbaaz Khan : “म्हाताऱ्यासोबत तू खूश आहे का?” ट्रोल करणाऱ्याला अरबाज खानच्या पत्नीचे सडेतोड उत्तर
दुसऱ्या एका युजरनं विचारले केली की, “तुझं वजन थोडं वाढलं आहे…” त्यावर शुरा हसली आणि लिहिलं की, “थोडंसं? माझं वजन 20 किलोनं वाढलं आहे.”
दरम्यान, शुरा खान ही एक व्यावसायिक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट असून तिनं प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनसोबत काम केलं. अरबाजनं 2023 मध्ये शूराशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगीही आहे. (Sshura and Arbaaz Khan)
अरबाज हा त्याच्या पत्नीपेक्षा 23 वर्षांनी मोठा आहे. वयातील या अंतरामुळे दोघांनाही अनेकदा ट्रोल केलं जातं. अरबाज खानचं पहिलं लग्न 1994 मध्ये अभिनेत्री-मॉडेल मलायका अरोरासोबत झालेलं, दोघांना अरहान खान नावाचा एक मुलगा आहे. मात्र, 2017 मध्ये या जोडप्यानं घटस्फोट घेतला. (Sshura and Arbaaz Khan)
हेही वाचा:





