“पागल है क्या?”, पापाराझींवर अभिनेते मनोज बाजपेयी संतापले

Manoj Bajpayee Video | सेलिब्रिटींच्या एका झलकसाठी पापाराझी त्यांच्या मागे-पुढे सतत फिरत असतात. कलाकारांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करून चाहत्यांपर्यंत पोहचवण्याचे काम पापाराझी करतात. जिम, रेस्टॉरंट, सलून, पब, एअरपोर्ट अशा विविध ठिकाणी सेलिब्रिटींचा पाठलाग करून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करतात. मात्र सततच्या या फोटोंना कलाकार देखील वैतागल्याचे पाहायला मिळतात.
सध्या सोशल मिडियावर अभिनेते मनोज बाजपेयी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत मनोज बाजपेयी विमानतळावर गाडीतून बाहेर येताच एका ठिकाणी उभे राहतात, तेव्हा त्यांना पापाराझी पोज देण्यासाठी सांगतात. मात्र, फोटोसाठी विचारणा करताच मनोज बाजपेयी चिडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. Manoj Bajpayee Video |
View this post on Instagram
यावेळी ते पापाराझींना म्हणतात, “अरे काय? कशासाठी करताय हे? वेडे आहात का? इथे मी फोटो काढायला थोडी आलो आहे.” यानंतर ते पुढे निघून जातात. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून काहींनी त्यांचे समर्थन केले आहे. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. Manoj Bajpayee Video |
दरम्यान, मनोज बाजपेयी यांच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. त्यांची ‘द फॅमिली मॅन’ ही सीरिज प्रचंड गाजली. लवकरच या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अलीकडेच मनोज बाजपेयींची ‘इन्स्पेक्टर झेंडे’ ही ओटीटीवर आलेली फिल्म चर्चेत होती, ज्यात त्यांच्या कॉमिक टायमिंगचं खूप कौतुक झालं. Manoj Bajpayee Video |
हेही वाचा:





