“तू हिंदू आहेस का”? टोचलेल्या कानांवरून त्या व्यक्तीने हिरलं; अजित डोवालांनी सांगितला पाकिस्तानातील थरारक अनुभव

Ajit Doval : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भारत पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक चर्चा केली जात आहे. डोवाल यांनी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या भूमिका चोख बजावल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेची आखणी आणि अंमलबजावणीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्याने त्यांनी अनेक देशांमध्ये भारतीय मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. डोवाल यांनी पाकिस्तानात ७ वर्ष रॅा एजंट म्हणून काम केले आहे. या काळातील थरारक अनुभवाची आठवण त्यांनी एका प्रेस ब्रिफिंगमध्ये विचारलेल्या प्रश्नावर केली आहे.
अजित डोवाल यांची भारताचा जेम्स बॅाण्ड असेही म्हटले जाते. त्यांनी तब्बल ७ वर्ष पाकिस्तानमध्ये राहून भारतासाठी रॅा एजंट म्हणून घालवली . या काळात ते पाकिस्तानमध्ये राहून गुप्तपणे भारतासाठी काम करत होते. या काळात ते मोठ्या धर्मसंकटात सापडले होते. त्यांची ओळख उघडी होण्याची वेळी आली होती. मात्र, त्यांनी एक व्यक्ती भेटली आणि त्याने तू हिंदू आहेस का असा प्रश्न विचारला. त्याने विचारलेल्या प्रश्नावर डोवाल यांनी दिलेले उत्तर आणि घडलेली घटना सांगितली आहे.
View this post on Instagram
तुमच्या कानाची प्लॅास्टिक सर्जरी करून घ्या
पाकिस्तानमधील लाहोरमध्ये एका मजारजवळ ते थांबले होते. त्याचवेळी त्यांच्या जवळ एक व्यक्ती आली आणि तू हिंदू आहेस का असा प्रश्न त्या व्यक्ताने डोवाल यांना केला. या प्रश्नार त्यांनी हिंदू असल्याचे नाकारले. त्यानंतर ती व्यक्ती त्यांना एका खोलीत घेऊन गेली. तुमचे कान टोचलेले आहेत आणि हे फक्त हिंदूच करतात, अशी ती व्यक्ती त्यांना म्हणाली. त्यानंतर डोवाल हिंदू आहेत याचा स्वीकार केला. तुमच्या कानाची प्लॅास्टिक सर्जरी करून घ्या, असा सल्ला त्या व्यक्तीने डोवाल यांना दिला होता. ती व्यक्ती हिंदूच होती आणि पाकिस्तानमध्ये वेश बदलून राहत असल्याचे देखील डोवाल यांनी सांगितले.





