रायगड जिल्ह्यातील १५ हजारहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र? आदिती तटकरेंनी सांगितले सत्य

Aditi Tatkare | राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून विविध विभागांच्या मदतीनं अर्जांची छाननी सुरु आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींची संख्या समोर आली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातच एकूण 15,849 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. अनेक महिलांचे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे फॉर्म अपात्र झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे. यावर आता आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे.
आदिती तटकरे यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “रायगड जिल्ह्यातील १५ हजारहून अधिक महिला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र झाल्याचे वृत्त जनतेची दिशाभूल करणारे आहे. दिनांक २८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकषांच्या आधारावर महिलांनी अर्ज केले. Aditi Tatkare |
त्यानंतर प्रत्येक जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र/अपात्र महिलांची वर्गवारी केली. त्यानुसार रायगड जिल्ह्यातून आलेल्या एकूण अर्जांपैकी सुमारे ६ लाख अर्ज पात्र ठरले, तर १५,८४९ महिला अर्ज छाननी प्रक्रियेतच अपात्र ठरल्या होत्या. ही संपूर्ण प्रक्रिया बऱ्यापैकी सुमारे दिनांक १० ऑक्टोबर २०२४ पूर्वीच पार पडली आहे.” Aditi Tatkare |
रायगड जिल्ह्यातील १५ हजारहून अधिक महिला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून अपात्र झाल्याचे वृत्त जनतेची दिशाभूल करणारे आहे.
दिनांक २८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकषांच्या आधारावर महिलांनी अर्ज केले. त्यानंतर प्रत्येक जिल्हा पातळीवर… https://t.co/EM86lByjxV
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 25, 2025
पुढे त्यांनी लिहिले की, “पात्र ठरलेल्या सर्व महिलांना मार्च २०२५ पर्यंतचा सन्मान निधी यशस्वीरित्या वितरित करण्यात आला आहे. ज्या अर्जदार कधी योजनेसाठी पात्रच ठरल्या नाहीत, ज्यांना कधी योजनेचा लाभ देण्यात आला नाही त्या महिलांना पुन्हा नव्याने अपात्र ठरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे हा खोटा संदर्भ देऊन करण्यात आलेले वृत्त धादांत खोटे व खोडसाळ आहे. महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. एकाही पात्र भगिनीवर अन्याय होणार नाही हा शब्द मी संपूर्ण महाराष्ट्रातील भगिनींना देते,” असा विश्वासही आदिती तटकरे यांनी दिला.
2100 रुपयांसाठी प्रतिक्षाच करावी लागणार
दरम्यान, विधानसभा निवडणूक प्रचाराचा काळात लाडक्या बहिणींचे 1500 रुपयांचे मानधन वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. मात्र, अद्यापही याबाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आदिती तटकरे यांनीही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. Aditi Tatkare |
हेही वाचा:
Sangli Politics : सांगलीत ठाकरे गटाला खिंडार; जिल्हा प्रमुखांसह शेकडो शिवसैनिक शिंदेसेनेत





